मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी ओळखल्या जात असलेल्या जिगिशा क्रिएशन्स यावेळी आणखीन एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला आहे. हिंदी सिनेसृष्टीतील प्रख्यात पब्लिसिटी डिझायनर राहुल नंदा यांना प्रथमच मराठी सिनेसृष्टीत आणण्याचे श्रेय या संस्थेकडे असून राहुल नंदा यांनी १ मे रोजी प्रदर्शित होत असलेल्या चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित “दुसरी गोष्ट” सिनेमासाठी पब्लिसिटी डिझायनर म्हणून काम पहिले आहे.
तब्बल ६५० पेक्षा ही अधिक सिनेमांसाठी पब्लिसिटी डिझाईंनचे काम करून आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती प्रस्थापित केली असून त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. जय हो, फुक्रे, मद्रास कॅफे, बेशरम यांसारख्या अलीकडे गाजलेल्या सिनेमांसाठीदेखील त्यांनी काम केले आहे.हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्धी तंत्राचे एक वेगळे परीमाण त्यांनी दाखल केले आहे. त्यामुळेच मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीचेही लक्ष या सिनेमाकडे लागून राहिले आहे.
“दूसरी गोष्ट” चे प्रस्तुतकर्ता जिगिशा क्रिएशन असून “जीवणगाणी” च्या डॉ. शैलजा गायकवाड, मंजिरी हेटे आणि प्रसाद महाडकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.या सिनेमात अभिनेते विक्रम गोखले, सिद्धार्थ चांदेकर,.आनंद इंगळे, नेहा पेंडसे, संदीप मेहता, आदित्य गानू, भारती पाटील, स्मिता सरवदे, सुनील तावडे, गिरीश जोशी यांच्या महत्वपूर्ण भूमिका असून मुग्धा गोडसे, प्रतीक्षा लोणकर आणि रेणुका शहाणे पाहुण्या कलाकारांच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. येत्या १ मे २०१४ रोजी राज्यातील १७२ चित्रपटगृहात “दूसरी गोष्ट” हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
सुप्रसिद्ध पब्लिसिटी डिझायनर राहुल नंदा यांचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण!
No comments:
Post a Comment